“अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत” – सोलापुरात ओवैसींचा थेट हल्ला

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत AIMIM पक्षही रिंगणात उतरला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख आणि खासदार Asaduddin Owaisi राज्यभर प्रचारसभा घेत आहेत.

सोलापुरात झालेल्या प्रचारसभेत ओवैसींनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अजित पवारांना दिलेले मत म्हणजे थेट Narendra Modi यांना दिलेले मत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशात कोणताही भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. “एक दिवस असा येईल की, या देशाची पंतप्रधान हिजाब घातलेली महिला असेल,” असे विधान त्यांनी केले.

सोलापुरात Solapur येथे एआयएमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती.

“हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल”

सोलापुरातील Solapur येथे एआयएमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ओवैसी म्हणाले,  “पाकिस्तानच्या घटनेत एका विशिष्ट धर्मातील व्यक्तीच पंतप्रधान होऊ शकतो असे लिहिले आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारतात कोणताही भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. एक दिवस असा येईल की, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस पाहण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण तो दिवस नक्की येईल.”

“अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत”

सोलापुरातील अनेक प्रभागांमध्ये एआयएमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात थेट लढत आहे. त्यावर भाष्य करताना ओवैसी म्हणाले, “मी देशाच्या संसदेत बोलतो. अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसले आहेत. अजित पवारांना दिलेलं मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे. वक्फ कायद्यालाही तेच समर्थन आहे.” तसेच,“मोदी, शिंदे आणि अजित पवार हे तिघेही एकच त्रिमूर्ती आहेत. ते तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, पण त्यांना मतपेटीतून उत्तर द्यावं लागेल,” अशी टीकाही त्यांनी केली.

“नई जिंदगी परिसर सोलापुराचं हृदय”

ओवैसींनी सोलापुरातील नई जिंदगी परिसराचा उल्लेख करत विरोधकांना इशारा दिला. “भाजपा, आरएसएस, अजित पवार आणि शिंदेंचे लोक या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हा परिसर सोलापुराचं हृदय आहे. याबद्दल कोणी चुकीचं बोललं, तर मी गप्प बसणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.