Nanded Crime News : ‘तुझं लग्न लावून देतो’, आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच…

Nanded Crime News : सक्षमची प्रेयसी आंचलचे वडील यांच्यासह इतर पाचजणांना अटक केली आहे. या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नांदेड: पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडली. आंतरजातीय प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधातून तरुणीचे वडील आणि भावांनी मिळून तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. आंतरजातीय प्रेम संबंध आणि संभाव्य लग्नावरून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांची सक्षमची प्रेयसी आंचलचे वडील यांच्यासह इतर पाचजणांना अटक केली आहे. या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सक्षम ताटे याचे त्याच्याच मित्राची बहीण आंचल मामीलवाड हिच्यासोबत प्रेमसंबंधहोते. मात्र, मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध समजताच वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु राहिले. तर, दुसरीकडे आंचलच्या वडिलांनी तिला तुझं लग्न लावून देण्याचा शब्द दिला. मात्र, तिच्यासमोर एक अट ठेवली. या अटीला अमान्य केल्यानं आंचल आणि सक्षमचा घात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुरुवारी, संध्याकाळी 5 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास सक्षम ताटे याला मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले होते. सक्षम हा दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. याठिकाणी आल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघांनी मारहाण करुन त्याची हत्या केली. हत्ये आधी सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतरही जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. त्यानंतर सक्षम संपला.

आंचलने सांगितले की, तीन वर्षांपासून सक्षम ताटेचे आणि माझे प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते. त्यासाठी माझे वडील गजानन मामीडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमचा घात केला. 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आंचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. तुझं आम्ही लग्न लावून देतो. पण आमची एकच अट आहे. तू दुसरा कुणीही आण पण हा नकोच! असं वारंवार वडिलांनी सांगितलं. तू त्याला सोड नाहीतर मारून टाकू अशीही धमकी देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं असल्याचे आंचलने म्हटले.