महाराष्ट्र शासनाच्या महिला समृद्धी योजना अंतर्गत चर्मकार समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेद्वारे पात्र महिलांना फक्त ४ टक्के कमी व्याजदराने ₹50,000 पर्यंत कर्ज दिले जाते. महिलांनी स्वतःचा छोटा उद्योग, व्यवसाय किंवा स्वावलंबी उपक्रम सुरू करावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला चर्मकार (अनुसूचित जाती) समाजातील असणे आवश्यक आहे. तसेच ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाचा वापर स्वयंरोजगार, छोटे उद्योग, घरगुती व्यवसाय, शिवणकाम, किराणा दुकान, ब्युटी पार्लर, शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या कामांसाठी करता येतो.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कमी व्याजदरासोबतच काही प्रकरणांमध्ये अनुदानाचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांवरील कर्जाचा आर्थिक ताण कमी होतो. कर्जाची रक्कम संबंधित बँकेमार्फत किंवा महामंडळाच्या माध्यमातून वितरित केली जाते.
अर्ज करण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते आणि व्यवसायाचा प्रस्ताव असणे आवश्यक आहे. पात्र महिलांनी आपल्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालय, संबंधित महामंडळ किंवा अधिकृत पोर्टलवरून अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महिला समृद्धी योजना ही चर्मकार समाजातील महिलांसाठी स्वावलंबनाची नवी संधी ठरत असून, आर्थिक प्रगतीसाठी एक मजबूत आधार देणारी योजना म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.