धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार; नगरपरिषद अधिनियमात सुधारणा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई | प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे.

अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी एक एकर जागा

धाराशिव जिल्ह्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय

1️⃣ जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम
ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
(सामान्य प्रशासन विभाग)

2️⃣ बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित
जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत व सेवानिवृत्त सेविकांच्या नियुक्त्यांना नियमित करण्याचा निर्णय.
(ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

3️⃣ धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
स्मारकासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जमीन मंजूर.
(महसूल विभाग)

4️⃣ नगरपरिषद अधिनियमात सुधारणा
थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना सदस्यत्व व मताचा अधिकार; यासाठी अध्यादेश काढणार.
(नगर विकास विभाग)

दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राजधानी दिल्लीतही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोच्या 12 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात 13 नवीन स्टेशन असणार आहेत. ज्यामध्ये, 10 अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आणि 3 उड्डाण स्टेशन असणार आहेत. राजधानी दिल्लीतील हा 16 किलोमीटरचा प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्ण होईल. या निर्णयामुळे दिल्लीतील मेट्रोचं जाळ आता 400 किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहे. देशातील सर्वात विस्तीर्ण असं हे मेट्रोचं जाळ असेल.