शिवराज चाकूरकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांचा शोक; लातूरमध्ये पार्थिवाचे अंत्यदर्शन

लातूर : शिवराज चाकूरकर यांच्या निधनाने लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर येथे भेट देऊन चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुखःद प्रसंगात सांत्वन व्यक्त केले.

 
शिवराज चाकूरकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, “चाकूरकर यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी होते. त्यांचे निधन ही मोठी हानी आहे.”


या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.