PM Modi on Nehru In Parliament: वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चेला सुरूवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.

यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस पक्ष आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर काही आरोप केले. दरम्यान संसदेतील चर्चेत सहभागी झालेले काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या यापूर्वीच्या संसदेतील भाषणात नेहरू आणि काँग्रेसचा किती वेळा उल्लेख केला याची आकडेवारीच वाचून दाखवली. गोगोई नेमकं काय म्हणाले?
गोगोई त्यांच्या भाषणात म्हणाले की, “आज पंतप्रधान मोदींचे भाषण मी खूप काळजीपूर्वक ऐकले, आणि त्यांच्या पूर्ण एक तासाच्या भाषणाचे दोन उद्देश होते. पहिला उद्देश हा होता की, त्यांचे बोलणे ऐकून असे वाटत होते की आपले राजकीय पूर्वज स्वत: ब्रिटिशांच्याविरोधात लढत होते. असे वाटत होते की आपले राजकीय पूर्वजांना ब्रिटिशांच्याविरोधात विविध आंदोलनात भाग घेतला.
ही इतिहास पु्न्हा लिहिण्याची इच्छा मला पंतप्रधान मोदींच्या भाषणात ऐकू आली.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “दुसरा उद्देश हा होता की, या वंदे मातरम वरील संपूर्ण चर्चेला एक राजकीय रंग देण्याचा होता. त्यांनी काँग्रेस वर्किंग कमेटी आणि पंडीत नेहरूंबद्दल बोलले. आणि ही एक सवय आहे. माझ्याकडे एक टेबल आहे,
की जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी कोणत्याही विषयावर बोलतात, तेव्हा पंडीत नेहरू आणि काँग्रेसचे नाव किती वेळा घेतात. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत आपण पंतप्रधान मोदी यांना बोलताना ऐकले. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी त्यांनी १४ वेळा त्यांनी पंडीत नेहरूंचे आणि काँग्रेस पक्षाचे ५० वेळा नाव घेतले.
तसेच संविधानाची ७५ वी अॅनव्हर्सरी साजरी केली जात होती, तेव्हा १० वेळा पंडीत नेहरूंचे आणि २६ वेळा काँग्रेसचे नाव घेतले. तसेच २०२२ मध्ये जेव्हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी बोलत होते, तेव्हा त्यांनी १५ वेळा पंडित नेहरूंचे नाव घेतले. २०२० मध्ये राष्ट्रपती अभिभाषणावर मोदींनी भाषण दिले तेव्हा २० वेळा त्यांनी पंडित नेहरूंचे नाव घेतले,” असे गोगई म्हणाले. वंदे मातरमबद्दलच्या आरोपांना उत्तर देताना गोगोई पुढे म्हणाले की, “मी नम्रतापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला सांगू इच्छितो की, तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही पंडित नोहरूंच्या योगदानावर एकही काळा डाग लावण्यात यशस्वी होणार नाहीत. होय, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आणि त्याआधी मुस्लिम लीग यांच्यात विद्रोह होता.
मुस्लिम लीगचे म्हणणे होते की वंदे मातरमचा बहिष्कार केला पाहिजे. पण मुस्लिम लीगला हा अधिकार कुठून मिळाला? आणि काय मुस्लिम लीगनुसार आपला देश चालेल? मुस्लिम लीगनुसार काँग्रेस पक्ष चालेले? कधीही नाही.” “तेव्हाचे आमचे नेते मौलाना आझाद स्वत: म्हणाले की मला वंदे मातरममध्ये कोणतीही अडचण नाही. काँग्रेसचे मौलाना आझाद आणि मुस्लिम लीगचे जि यांच्यात हा फरक आहे.
त्यांनी लाखो प्रयत्न केल्यानंतरही, दबाव टाकण्यात आल्यानंतरही १९३७च्या काँग्रेस वर्किंग कमेटीच्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला की जेथे कुठे राष्ट्रीय संमेलन होईल तेथे आम्ही सुरूवातीला वंदे मातरमच्या पहिल्या दोन ओळी गाऊ. मुस्लिम लीगने यावर कठोर टीका केली आणि टीका हिंदू महासभेने देखील केली,” असे गौरव गोगोई म्हणाले. कधी-कधी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगचे राजकीय उद्देश एक होऊन जाता.
या दोन्हीनी वंदे मातरमला एका विशेष राजकीयदृष्ट्या पाहिले. दोघांनी काँग्रस पक्षावर टीका केली. पण काँग्रेस पक्ष कोण्या हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीगनुसार चालणार नाही, भारताचे लोक आणि वंदे मातरमचा जो मूळ भाव आहे त्यानुसार चालेले असेही गोगोई यावेळी म्हणाले.