“राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे नागपूरात भव्य स्वागत; पदभार स्विकारल्यानंतरची पहिली भेट”

नागपूर, दि. ७ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज सायंकाळी नागपुरात आगमन झाले. पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा असून शहरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमनानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.