
नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर १४७ कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात येणार आहे. याच योजनेअंतर्गत धाराशिव शहरातील रस्ते कामांवरील तात्पुरती स्थगिती रद्द झाल्याने शहरातील एकूण ५९ रस्त्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार आहेत.
शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणादादांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरोत्थान योजनेतून ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार असून, नगरपरिषद निवडणुकीनंतर तातडीने कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
या शुभारंभप्रसंगी दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, नगराध्यक्षा सौ. नेहाताई काकडे, अमित शिंदे, सुनील काकडे यांच्यासह प्रभागातील नगरसेवक अभिजित काकडे, राणीताई दाजी पवार, नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियोजित व वेगवान पद्धतीने कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नगरसेवक व नगराध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.